"आंतरराष्ट्रीय योग दिन 2025: कु. आराध्या आकाशेचा गोल्ड मेडलसह गौरव"
आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त उत्कर्ष विद्यालयाच्या कु. आराध्या माधव आकाशेला गोल्ड मेडल
छत्रपती संभाजी नगर जिल्हा योगासन स्पोर्ट असोसिएशन, गरवारे कम्युनिटी सेंटर आणि गरवारे बालभवन यांच्या संयुक्त विद्यमानाने 21 जून 2025 रोजी राष्ट्रीय योग दिनानिमित्त आयोजित विभागीय योगासन स्पर्धेत उत्कर्ष विद्यालय, सेलू येथील कु. आराध्या माधव आकाशे हिने प्रथम क्रमांक पटकावत गोल्ड मेडल मिळवले. या यशस्वी कामगिरीबद्दल मा. मंत्री श्री अतुल सावे यांच्या हस्ते तिला गोल्ड मेडल आणि सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले.
या प्रसंगी श्रीराम प्रतिष्ठान संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. संजय रोडगे यांनी कु. आराध्याचे हार्दिक अभिनंदन करत तिच्या यशाबद्दल कौतुक केले. तसेच उत्कर्ष विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री कैलास ताठे यांनीही तिच्या यशाबद्दल अभिमान व्यक्त करत तिला शुभेच्छा दिल्या.
कु. आराध्याच्या या यशामुळे उत्कर्ष विद्यालय आणि संपूर्ण सेलू परिसरात आनंदाचे वातावरण आहे. तिच्या या यशाने योगासन क्षेत्रात नवीन प्रेरणा निर्माण झाली असून, इतर विद्यार्थ्यांसाठी ती एक प्रेरणास्थान ठरली आहे.
कु. आराध्या माधव आकाशे यांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा!
Comments
Post a Comment