प्रिन्स इंग्लिश स्कूलचे डॉ. होमी भाभा परीक्षा 2025 मध्ये जिल्ह्यात अव्वल यश.
डॉ. होमी भाभा परीक्षा 2025 मध्ये प्रिन्स इंग्लिश स्कूलचे जिल्ह्यात अव्वल यश. सेलू येथील श्रीराम प्रतिष्ठान संचलित एल. के. आर. रोडगे प्रिन्स इंग्लिश स्कूलने डॉ. होमी भाभा बालवैज्ञानिक परीक्षा 2025 मध्ये घवघवीत यश संपादन करून जिल्ह्यात अव्वल निकालाची नोंद केली आहे. शाळेतील एकूण 61 विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली असून त्यापैकी 45 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. विशेष म्हणजे 6 विद्यार्थी Second Round (Practical Round) साठी पात्र ठरले आहेत. हे यश शाळेत राबविण्यात येणाऱ्या सर्वसमावेशक अध्ययन पद्धतीचे फलित आहे. होमी भाभा परीक्षेच्या तयारीसाठी शाळेत विशेष अभ्यासक्रम, संकल्पनाधारित अध्यापन, प्रयोगांवर आधारित शिकवण, नियमित सराव चाचण्या व शंका निरसन सत्रे घेतली जातात. यासोबतच विद्यार्थ्यांसाठी विषयतज्ज्ञांचे Guest Lecture Series नियमितपणे आयोजित करण्यात येते, ज्यामुळे विद्यार्थ्यांना विविध विषयांतील तज्ञांकडून मार्गदर्शन व प्रेरणा मिळते. शाळेत सर्व विषयांसाठी सुसज्ज प्रयोगशाळा उपलब्ध असून विज्ञान, गणित, संगणक तसेच इतर विषयांचे प्रयोग व प्रात्यक्षिकांद्वारे अध्यापन केले जाते. या प्रयोगशाळा-कें...