प्रिन्स इंग्लिश स्कूलच्या दोन विद्यार्थिनींनी पटकावले शिष्यवृत्ती परीक्षेत राज्यस्तरीय अव्वल क्रमांक .
प्रिन्स इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती परीक्षेत यश; राज्य गुणवत्ता यादीत दोन विद्यार्थिनींनी गाजवला अव्वल क्रमांक.
पुणे, दि. १० जुलै २०२५: महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात आलेल्या २०२४-२५ च्या शिष्यवृत्ती परीक्षेत एल. के. आर. रोडगे प्रिन्स इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश मिळवले आहे. शाळेच्या इयत्ता ५ वी आणि ८ वीच्या प्रत्येकी २४ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा यशस्वीपणे उत्तीर्ण केली. विशेष म्हणजे, १० जुलै रोजी जाहीर झालेल्या राज्यस्तरीय गुणवत्ता यादीत शाळेच्या दोन विद्यार्थिनींनी अव्वल स्थान पटकावले आहे.
इयत्ता ५ वीच्या प्रेरणा बाबासाहेब काष्टे हिने राज्यात ६ वा क्रमांक मिळवला, तर उन्नती विजयकुमार राठी हिने १० वा क्रमांक प्राप्त करून शाळेची मान उंचावली. सलग दुसऱ्या वर्षी शाळेच्या विद्यार्थ्यांनी CBSE/ICSE बोर्डाच्या गुणवत्ता यादीत पहिल्या १० मध्ये स्थान मिळवले आहे.
या यशाबद्दल श्रीराम प्रतिष्ठान संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय रोडगे, सचिव सविता रोडगे, प्रशासकीय अधिकारी महादेव साबळे, शाळेचे मुख्याध्यापक कार्तिक रत्नाला आणि प्रगती क्षीरसागर यांनी विद्यार्थ्यांचे आणि त्यांच्या मार्गदर्शकांचे कौतुक केले. शाळेच्या यशस्वी विद्यार्थ्यांनी आपल्या मेहनतीने आणि समर्पणाने शाळेचे नाव उज्वल केल्याचा अभिमान या सर्वांनी व्यक्त केला.
Comments
Post a Comment