उत्कर्ष विद्यालयात आषाढी एकादशी निमित्त वृक्षदिंडी चे आयोजन व दिंडी उत्सव संपन्न.

उत्कर्ष विद्यालयात आषाढी एकादशी निमित्त वृक्षदिंडी चे आयोजन व दिंडी उत्सव संपन्न.


सेलू श्रीराम प्रतिष्ठान संचलित उत्कर्ष विद्यालय व ज्ञानतीर्थ माध्यमिक विद्यालयात आषाढी-एकादशी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. विद्यार्थ्यांनी यावेळी पारंपारिक वेशभूषा साकारत विठूनामाचा गजर केला. यावेळी विठोबाच्या पालखीचे पूजन संस्थेचे अध्यक्ष डॉ.संजय रोडगे सर व डॉ. सविता ताई रोडगे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपस्थित संस्थेचे प्रशासकीय अधिकारी श्री. महादेव साबळे सर उत्कर्ष विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. कैलास ताठे सर व ज्ञानतीर्थ माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. हरिभाऊ कांबळे, श्री उद्धव येवले उपस्थित होते.विद्यार्थ्यांनी केलेल्या विठोबा-रखुमाईच्या वेशभूषेने हा सोहळा अधिक रंगला. या वेळी विद्यार्थ्यांनी नृत्य सादर केले. माऊली माऊली विठ्ठल विठ्ठल अशा जयघोषाने शालेय परिसर दुमदुमला होता. तसेच यावेळी विविध संताची वेशभूषा विद्यार्थ्यांनी साकारली होती. कीर्तन, आपल्या दैनंदिन जीवनात वृक्षाचे स्थान व वृक्षांचे महत्त्व, उपयोग तुकाराम महाराजांच्या अभंगातून पटवून सांगितले. तसेच महाराष्ट्राची भक्ती परंपरा व वारकरी संप्रदायातील यांचे महत्त्व विद्यार्थ्यांना या कार्यक्रमातून सांगण्यात आले. व दिंडी उत्सहात संपन्न झाला या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उत्कर्ष विद्यालय व ज्ञानतीर्थ माध्यमिक विद्यालयाचे शिक्षकांनी परिश्रम घेतले.

Comments

Popular posts from this blog

प्रिन्स इंग्लिश स्कूलमध्ये आषाढी एकादशीचा भक्तिमय सोहळा उत्साहात संपन्न.

🚀 "स्वप्नांना आकाशाची सीमा नसते" – प्रिन्स इंग्लिश स्कूलच्या पूजाने रचला इतिहास!

पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या हस्ते प्रिन्स इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थिनींचा परभणी जिल्हाधिकारी कार्यालयात सत्कार.