ज्ञानतीर्थ विद्यालयात आषाढी एकादशीचा उत्साह! टाळ-मृदंगाच्या गजरात, विठूमाऊलीच्या भक्तीत रंगलेली दिंडी.

ज्ञानतीर्थ विद्यालयात आषाढी एकादशीचा उत्साह! टाळ-मृदंगाच्या गजरात, विठूमाऊलीच्या भक्तीत रंगलेली दिंडी!


आज ज्ञानतीर्थ विद्यालय सेलू या शाळेत आषाढी एकादशी निमित्त शालेय दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी शालेय दिंडीत संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ संजय रोडगे साहेब, संस्थेच्या सचिव डॉ सविता रोडगे मॅडम, आदरणीय रामरावजी रोडगे, मुख्याध्यापिका सौ.शालिनी शेळके, सर्व शिक्षकवृंद तसेच मोठ्या प्रमाणावर बाल वारकरी उपस्थित होते.


सकाळपासूनच चिमुकल्या वारकर्यांची लगबग शाळेत होती. सर्व विद्यार्थी जणूकाही पंढरपूरच्या वारीतच आहेत असे वातावरण झाले होते. सर्व भक्तिमय वातावरणाचा मुलांनी अनुभव मिळाला. या शालेय दिंडीत विठल रुक्मिणी, संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ, वारकरी यांची वेशभूषा देखाव्यातून साकारली होते.

ज्ञानतीर्थ विद्यालया तर्फे आषाढी एकादशीनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा....!

Comments

Popular posts from this blog

प्रिन्स इंग्लिश स्कूलमध्ये आषाढी एकादशीचा भक्तिमय सोहळा उत्साहात संपन्न.

🚀 "स्वप्नांना आकाशाची सीमा नसते" – प्रिन्स इंग्लिश स्कूलच्या पूजाने रचला इतिहास!

पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या हस्ते प्रिन्स इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थिनींचा परभणी जिल्हाधिकारी कार्यालयात सत्कार.