ज्ञानतीर्थ माध्यमिक विद्यालयाची कु हर्षदा कास्टे प्रथम.
अखिल भारतीय विज्ञान मेळावा 2025 अंतर्गत तालुकास्तरीय विज्ञान मेळावा मध्ये ज्ञानतीर्थ माध्यमिक विद्यालयाची कु हर्षदा कास्टे प्रथम.
सेलू: दिनांक 13 ऑगस्ट 2025 रोजी स्वामी विवेकानंद विद्यालय सेलू येथे आयोजित अखिल भारतीय विज्ञान विद्यार्थी मेळावा अंतर्गत तालुकास्तरीय विज्ञान मेळावा आयोजित करण्यात आलेला होता त्यामध्ये ज्ञानतीर्थ विद्यालयाची विद्यार्थिनी कु. कास्टे हर्षदा नीलकंठ हीने उत्तम सादरीकरण करत प्रथम क्रमांक पटकावला आहे.
त्याबद्दल तिचे श्रीराम प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ.संजय रोडगे सर, संस्थेच्या सचिव डॉ.सविता रोडगे मॅडम, प्रशासकीय अधिकारी प्रा महादेव साबळे सर, ज्ञानतीर्थ विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ शालिनी शेळके मॅडम, ज्ञानतीर्थ माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री हरिभाऊ कांबळे सर मार्गदर्शक शिक्षक श्री.इ.पी.पांचाळ सर ,श्री.डी.एस.ठोके सर आदींनी कौतुक केले.
*हार्दिक अभिनंदन!*🎊🎊💐💐
Comments
Post a Comment