अखिल भारतीय विज्ञान विद्यार्थी मेळाव्यात ज्ञानतीर्थ विद्यालय प्रथम.

अखिल भारतीय विज्ञान विद्यार्थी मेळावा 2025 अंतर्गत तालुकास्तरीय विज्ञान विद्यार्थी मेळावा मध्ये प्रथम क्रमांक मिळविलेल्या कु. हर्षदा काष्टे हिचा डॉ. संजय रोडगे सर यांच्या हस्ते सत्कार.

सेलू : दिनांक 13 ऑगस्ट 2025 रोजी स्वामी विवेकानंद विद्यालय सेलू येथे आयोजित अखिल भारतीय विज्ञान विद्यार्थी मेळावा अंतर्गत तालुकास्तरीय विज्ञान विद्यार्थी मेळावा आयोजित करण्यात आलेला होता त्यामध्ये ज्ञानतीर्थ माध्यमिक विद्यालयाची विद्यार्थिनी कु.काष्टे हर्षदा नीलकंठ हीने *"Quantum age begins: potential and challenges"* या विषयावर
उत्तम सादरीकरण करत प्रथम क्रमांक पटकावला आहे.
त्याबद्दल तिचे श्रीराम प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ.संजय रोडगे सर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला, त्याप्रसंगी संस्थेच्या सचिव डॉ.सौ.सविता रोडगे मॅडम, प्रशासकीय अधिकारी प्रा महादेव साबळे सर, ज्ञानतीर्थ विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ शालिनी शेळके मॅडम, ज्ञानतीर्थ माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री हरिभाऊ कांबळे सर, उत्कर्ष विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. कैलास ताठे सर आदी मान्यवर उपस्थित होते. 
कार्यक्रम प्रसंगी डॉ.संजय रोडगे सर यांनी मार्गदर्शनपर भाषणात म्हणाले की, *"श्रीराम प्रतिष्ठान... गुणवंतांची खाण"*
या प्रमाणे आत्तापर्यंत झालेल्या अखिल भारतीय विज्ञान विद्यार्थी मेळावा तालुकास्तरीय सेमिनार स्पर्धेमध्ये श्रीराम प्रतिष्ठान अंतर्गत घटक संस्थेतील विद्यार्थ्यांनी तब्बल 12 वेळा तालुकास्तरीय प्रथम क्रमांक मिळवलेला आहे, हे खरोखरच गौरवाची, कौतुकाची बाब आहे तसेच हर्षदा काष्टे, तनिष्का तेलभरे, यासारखे विद्यार्थी संस्थेअंतर्गत घडावेत म्हणून लवकरच एक *आधुनिक तंत्रज्ञान युक्त विज्ञान केंद्र* उभारण्याचे नियोजित आहे या केंद्राचा निश्चितपणे श्रीराम प्रतिष्ठान मधील सर्व विद्यार्थ्यांना तसेच सेलू परिसरातील, जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना निश्चित चांगला फायदा होईल. व वैज्ञानिक घडतील याची खात्री आहे, कु. हर्षदा काष्टे हिला मार्गदर्शक शिक्षक श्री.इ.पी.पांचाळ सर ,श्री.डी.एस.ठोके सर, श्री व्ही.जी. सरकटे सर यांनी मार्गदर्शन केले.

Comments

Popular posts from this blog

प्रिन्स इंग्लिश स्कूलमध्ये आषाढी एकादशीचा भक्तिमय सोहळा उत्साहात संपन्न.

🚀 "स्वप्नांना आकाशाची सीमा नसते" – प्रिन्स इंग्लिश स्कूलच्या पूजाने रचला इतिहास!

पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या हस्ते प्रिन्स इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थिनींचा परभणी जिल्हाधिकारी कार्यालयात सत्कार.