प्रिन्स इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांचे यश: फ्लोअर बॉल स्पर्धेत तीन रौप्य पदके!
राज्यस्तरीय फ्लोअर बॉल स्पर्धेत प्रिन्स इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांचे यश; तीन रौप्य पदके.
परभणी संघात वैभव उत्तम शेळके, प्रवीण कैलास बंदुके, एकलनाथ नरहरी माघाडे, वैभव संजय बोडके आणि निलेश अर्जुन बोडखे या प्रिन्स इंग्लिश स्कूलच्या इयत्ता ९ वीच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट प्रदर्शन केले. त्यांच्या सांघिक खेळामुळे परभणी संघाने रौप्य पदके मिळवली.
या यशात शाळेचे क्रीडा शिक्षक कुणाल चव्हाण, सुरज शिंदे, प्रमोद गायकवाड आणि कपिल ठाकूर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. त्यांनी विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देऊन स्पर्धेसाठी तयार केले. या प्रशिक्षकांनी विद्यार्थ्यांमध्ये सांघिक भावना आणि क्रीडा कौशल्य विकसित करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
श्रीराम प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉ. संजय रोडगे यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करताना सांगितले, “वैभव, प्रवीण, एकनाथ, वैभव आणि निलेश यांनी आपल्या मेहनतीने आणि क्रीडा शिक्षकांच्या मार्गदर्शनाने हे यश मिळवले आहे. त्यांच्या या कामगिरीमुळे शाळेचा आणि परभणी जिल्ह्याचा गौरव वाढला आहे.”
शाळेचे मुख्याध्यापक श्री. कार्तिक रत्नाला यांनी सांगितले, “आमच्या इयत्ता ९ वीच्या विद्यार्थ्यांनी 11व्या राज्यस्तरीय फ्लोअर बॉल स्पर्धेत रौप्य पदक मिळवून शाळेच्या क्रीडा क्षेत्रातील उत्कृष्टतेची परंपरा कायम ठेवली आहे. आम्ही त्यांच्या मेहनतीचे आणि क्रीडा शिक्षकांच्या मार्गदर्शनाचे कौतुक करतो.”
प्रिन्स इंग्लिश स्कूलच्या या पाच विद्यार्थ्यांनी आणि त्यांच्या मार्गदर्शकांनी जळगाव येथील 11व्या राज्यस्तरीय फ्लोअर बॉल स्पर्धेत परभणी जिल्ह्याचे नाव उंचावले आहे. श्रीराम प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉ. संजय रोडगे, सचिव डॉ.सविता रोडगे, प्रशासकीय अधिकारी प्रा. महादेव साबळे, मुख्याध्यापक कार्तिक रत्नाला,प्रगती क्षीरसागर आणि शाळेतील शिक्षकानी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.
Comments
Post a Comment