प्रिन्स इंग्लिश स्कूल, सेलू येथे राष्ट्रीय अवकाश दिन उत्साहात साजरा.
प्रिन्स
इंग्लिश स्कूल, सेलू येथे राष्ट्रीय अवकाश दिन
उत्साहात साजरा.
डॉ.
संजय रोडगे भारत गौरव पुरस्काराने सन्मानित.
सेलू,
दि.
२३ ऑगस्ट २०२५
श्रीराम
प्रतिष्ठान संचलित एल. के. आर. रोडगे प्रिन्स इंग्लिश स्कूल, सेलू
येथे आज, शनिवारी, दि. २३ ऑगस्ट २०२५ रोजी आनंददायी शनिवार अंतर्गत दुसरा राष्ट्रीय
अवकाश दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला श्रीराम
प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉ. संजय रोडगे, सचिव डॉ. सविता
रोडगे, प्रशासकीय अधिकारी प्रा. महादेव साबळे, मुख्याध्यापक
कार्तिक रत्नाला आणि सर्व शिक्षक उपस्थित होते.
राष्ट्रीय
अवकाश दिनानिमित्त शाळेत सकाळच्या परिपाठापासून कार्यक्रमाची सुरुवात झाली. हा
परिपाठ भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इसरो)च्या यशस्वी अवकाश मोहिमांवर आधारित
होता. इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी यामध्ये उत्कृष्ट प्रदर्शन करत
उपस्थितांचे लक्ष वेधले. शाळेची विद्यार्थिनी आणि रॉकेट सायंटिस्ट पूजा वायाळ हिने
रॉकेट लॉन्चिंगच्या प्रात्यक्षिकाद्वारे विद्यार्थ्यांना प्रेरणा देत मार्गदर्शन
केले. यावेळी डॉ. संजय रोडगे यांच्या हस्ते पूजा वायाळ, तनिष्का तेलभरे
आणि तेजश्री चौधरी या विद्यार्थिनींचा सत्कार करण्यात आला.
प्राथमिक
विभागातील चिमुकल्यांनी इसरोच्या मोहिमांवर आधारित आकर्षक प्रतिकात्मक मॉडेल्स
तयार केली. तसेच, चित्रकला स्पर्धेत विद्यार्थ्यांनी विविध विषयांवर सुंदर चित्रे
काढून आपली सर्जनशीलता दाखवली. माध्यमिक विभागातील विद्यार्थ्यांनी पावर पॉइंट
प्रेझेंटेशन, भाषण स्पर्धा आणि क्विझ स्पर्धेत सहभाग घेऊन इसरोच्या कार्याला
मानवंदना दिली.
डॉ.
संजय रोडगे यांनी यावेळी प्रस्तावित क्युरिऑसिटी सायन्स अँड इनोव्हेशन ऍक्टिव्हिटी
सेंटर बद्दल माहिती देताना सांगितले की, भविष्यात शाळेतील विद्यार्थी जीपीएस
लोकेशनद्वारे रॉकेट लॉन्चिंग करतील आणि यासाठी आम्ही मार्गदर्शन करू. त्यांच्या या
दृष्टिकोनाने विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक जिज्ञासा आणि नवनिर्मितीला चालना
मिळाली.
डॉ.
संजय रोडगे यांच्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक क्षेत्रातील
उल्लेखनीय कार्याची दखल घेत भारत सरकार आणि इसरोने त्यांचा भारत गौरव पुरस्काराने
सन्मान केला आहे. या पुरस्कारामुळे त्यांच्या कार्याला अधिक प्रेरणा मिळाली
आहे.
या
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विज्ञान विषयातील शिक्षकांनी विशेष मेहनत घेतली,
तर
इतर शिक्षकांचेही मोलाचे सहकार्य लाभले. डॉ. संजय रोडगे यांनी विद्यार्थ्यांचे
कौतुक करताना सांगितले, “हा सोहळा विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक
दृष्टिकोन आणि इसरोच्या यशस्वी मोहिमांबद्दल अभिमान निर्माण करणारा आहे.”
राष्ट्रीय
अवकाश दिनाचा हा कार्यक्रम विद्यार्थ्यांमध्ये अवकाश संशोधनाबाबत जागरूकता आणि
प्रेरणा निर्माण करणारा ठरला.
Comments
Post a Comment