ज्ञानतीर्थ विद्यालयात दहीहंडी उत्सव जल्लोषात.
📰 ज्ञानतीर्थ विद्यालयात दहीहंडी उत्सव जल्लोषात 🎉
विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग – परंपरेतून उमटला एकजुटीचा संदेश.
सेलू : श्रीराम प्रतिष्ठान संचलित ज्ञानतीर्थ माध्यमिक विद्यालय, सेलू येथे श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त दहीहंडी उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष श्री संजय रोडगे सर तसेच विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री हरीश कांबळे सर प्रमुख उपस्थिती होते. गोकुळ नगरीचे वातावरण निर्माण करत विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषेत सहभाग नोंदवून उत्सव अविस्मरणीय केला.
इयत्ता ८वी ते १०वीच्या विद्यार्थ्यांनी उत्साहाने मानवी मनोरा रचून दहीहंडी फोडली. या वेळी संजय रोडगे सरांनी विद्यार्थ्यांबरोबर आनंद लुटत त्यांचे कौतुक केले.
संपूर्ण कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यालयातील सर्व शिक्षकवृंदांनी परिश्रम घेतले.
✨ हा उत्सव विद्यार्थ्यांच्या एकजुटीचा, उत्साहाचा व परंपरेशी असलेल्या जिव्हाळ्याचा सुंदर प्रत्यय देणारा ठरला.
Comments
Post a Comment