Posts

Showing posts from September, 2025

विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबतच खेळातही भविष्य घडवावे: डॉ. संजय रोडगे.

Image
प्रिन्स इंग्लिश स्कूल येथे तालुकास्तरीय शालेय खो-खो स्पर्धा यशस्वी.  विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबतच खेळातही भविष्य घडवावे: डॉ. संजय रोडगे. सेलू , दि. १० सप्टेंबर २०२५: क्रीडा व युवक सेवा संचालनालय , महाराष्ट्र राज्य , पुणे आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय , परभणी यांच्या वतीने आयोजित तालुकास्तरीय शालेय खो-खो स्पर्धा श्रीराम प्रतिष्ठान संचलित एल. के. आर. रोडगे प्रिन्स इंग्लिश स्कूल , सेलू येथे यशस्वीपणे संपन्न झाल्या. या स्पर्धेचे अध्यक्षस्थान श्रीराम प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉ. संजय रोडगे यांनी भूषवले , तर उद्घाटक म्हणून केशवराज सोळंके , संचालक , मार्केट कमिटी उपस्थित होते. तालुका क्रीडा संयोजक प्रशांत नाईक , श्री. ठोंबरे , श्री. झिंजान आणि शाळेचे मुख्याध्यापक श्री. कार्तिक रत्नाला यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.   कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रीय क्रीडा दिन आणि मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेच्या पूजनाने झाली. याप्रसंगी व्यासपीठावरील मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. स्पर्धेचे प्रास्ताविक तालुका क्रीडा संयोजक प्रशांत नाईक यांनी केले. सूत्रसंचा...

प्रिन्स इंग्लिश स्कूलमध्ये प्रेसिडेंशियल टेस्ट कॅप सेरेमनी; अव्वल विद्यार्थ्यांना ऑरेंज व यलो कॅपने सन्मानित.

Image
प्रिन्स इंग्लिश स्कूलमध्ये प्रेसिडेंशियल टेस्ट कॅप सेरेमनी; अव्वल विद्यार्थ्यांना ऑरेंज व यलो कॅपने सन्मानित. सेलू, दि. १० सप्टेंबर २०२५: श्रीराम प्रतिष्ठान संचलित एल. के. आर. रोडगे प्रिन्स इंग्लिश स्कूल, सेलू येथे दरवर्षीप्रमाणे यावर्षीही प्रेसिडेंशियल टेस्ट यशस्वीपणे घेण्यात आली. इंग्रजी, विज्ञान आणि गणित या विषयांमध्ये इयत्ता १ ली ते १० वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांची चाचणी घेऊन प्रत्येक वर्गातील अव्वल दोन विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. या परंपरेनुसार प्रथम क्रमांक मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना ऑरेंज कॅप, तर द्वितीय क्रमांक मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना यलो कॅप देऊन गौरविण्यात आले. या उपक्रमाने विद्यार्थ्यांमध्ये शैक्षणिक स्पर्धा आणि उत्कृष्टतेची भावना वाढवण्यात आली. शाळेच्या प्रांगणात आयोजित या कार्यक्रमात डॉ. भाले, डॉ. सानप, डॉ. खलसे, खजिने मॅडम, नारायण चट्टे सर, तेलभरे सर, डॉ. नाईकनवरे, डॉ. सोनटक्के, रवी डासालकर, श्रीहरी अबुज सर, बैनवाड सर, चव्हाण सर, पुंडकरे सर, पांडुरंग काकडे सर, सोनवणे सर आणि सालुंखे सर यांसह शिक्षकवृंद उपस्थित होते. कार्यक्रमात विद्यार्थ्यांची उत्कृष...