जिल्हास्तरीय विज्ञान मेळाव्यात ज्ञानतीर्थच्या हर्षदा कास्टेला प्रथम क्रमांक.

जिल्हास्तरीय विज्ञान मेळाव्यात ज्ञानतीर्थच्या हर्षदा कास्टेला प्रथम क्रमांक.


सेलू, दि. 12 सप्टेंबर 2025: परभणी येथील जि.प. कन्या प्रशाला, स्टेशन रोड येथे आयोजित अखिल भारतीय विज्ञान विद्यार्थी मेळाव्यांतर्गत जिल्हास्तरीय विज्ञान मेळाव्यात ज्ञानतीर्थ माध्यमिक विद्यालयाची विद्यार्थिनी कु. हर्षदा नीलकंठ कास्टे हिने उत्कृष्ट सादरीकरण करत प्रथम क्रमांक पटकावला आहे.

हर्षदा हिच्या या यशाबद्दल श्रीराम प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. संजय रोडगे, सचिव डॉ. सविता रोडगे, प्रशासकीय अधिकारी प्रा. महादेव साबळे, ज्ञानतीर्थ माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. हरिभाऊ कांबळे, मुख्याध्यापिका सौ. शालिनी शेळके, उत्कर्ष विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. कैलास ताठे तसेच मार्गदर्शक शिक्षक श्री. ई.पी. पांचाळ यांनी तिचे कौतुक केले आहे.

Comments

Popular posts from this blog

प्रिन्स इंग्लिश स्कूलमध्ये आषाढी एकादशीचा भक्तिमय सोहळा उत्साहात संपन्न.

🚀 "स्वप्नांना आकाशाची सीमा नसते" – प्रिन्स इंग्लिश स्कूलच्या पूजाने रचला इतिहास!

पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या हस्ते प्रिन्स इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थिनींचा परभणी जिल्हाधिकारी कार्यालयात सत्कार.