प्रिन्स इंग्लिश स्कूलचे डॉ. होमी भाभा परीक्षा 2025 मध्ये जिल्ह्यात अव्वल यश.

 डॉ. होमी भाभा परीक्षा 2025 मध्ये प्रिन्स इंग्लिश स्कूलचे जिल्ह्यात अव्वल यश.




सेलू येथील श्रीराम प्रतिष्ठान संचलित एल. के. आर. रोडगे प्रिन्स इंग्लिश स्कूलने डॉ. होमी भाभा बालवैज्ञानिक परीक्षा 2025 मध्ये घवघवीत यश संपादन करून जिल्ह्यात अव्वल निकालाची नोंद केली आहे. शाळेतील एकूण 61 विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली असून त्यापैकी 45 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. विशेष म्हणजे 6 विद्यार्थी Second Round (Practical Round) साठी पात्र ठरले आहेत.


हे यश शाळेत राबविण्यात येणाऱ्या सर्वसमावेशक अध्ययन पद्धतीचे फलित आहे. होमी भाभा परीक्षेच्या तयारीसाठी शाळेत विशेष अभ्यासक्रम, संकल्पनाधारित अध्यापन, प्रयोगांवर आधारित शिकवण, नियमित सराव चाचण्या व शंका निरसन सत्रे घेतली जातात. यासोबतच विद्यार्थ्यांसाठी विषयतज्ज्ञांचे Guest Lecture Series नियमितपणे आयोजित करण्यात येते, ज्यामुळे विद्यार्थ्यांना विविध विषयांतील तज्ञांकडून मार्गदर्शन व प्रेरणा मिळते.


शाळेत सर्व विषयांसाठी सुसज्ज प्रयोगशाळा उपलब्ध असून विज्ञान, गणित, संगणक तसेच इतर विषयांचे प्रयोग व प्रात्यक्षिकांद्वारे अध्यापन केले जाते. या प्रयोगशाळा-केंद्रित शिक्षणामुळे विद्यार्थ्यांची संकल्पना स्पष्ट होत असून प्रत्यक्ष अनुभवातून शिकण्याची सवय लागते.


Second Round साठी पात्र विद्यार्थी पुढीलप्रमाणे आहेत.


इयत्ता 9 वी

सानवी मारेवार – 73

कृष्णा काकडे – 59


इयत्ता 6 वी

प्रेरणा काष्टे – 67

प्रज्वल रोडगे – 66

उन्नती राठी – 61

अभिनव धोपटे – 58


संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. संजय रोडगे यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर देणारी शाळेची शैक्षणिक दृष्टी स्पष्ट करताना सांगितले की, विद्यार्थ्यांमध्ये केवळ परीक्षेपुरते ज्ञान न राहता वैज्ञानिक दृष्टिकोन, तर्कशुद्ध विचार, प्रयोगशीलता आणि आत्मविश्वास निर्माण करणे हेच शाळेचे मुख्य उद्दिष्ट आहे.


या यशाबद्दल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. संजय रोडगे, सचिव डॉ. सविता रोडगे, डॉ. आदित्य रोडगे, प्रशासकीय अधिकारी प्रा. महादेव साबळे, मुख्याध्यापक कार्तिक रत्नाला व प्रगती क्षीरसागर यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील फेरीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.


या उल्लेखनीय यशामुळे प्रिन्स इंग्लिश स्कूल, सेलूने गुणवत्तापूर्ण शिक्षण, प्रयोगशाळा आधारित अध्यापन व तज्ज्ञ मार्गदर्शनाच्या जोरावर जिल्ह्यात आपले अग्रस्थान अधोरेखित केले आहे.

Comments

Popular posts from this blog

प्रिन्स इंग्लिश स्कूलमध्ये आषाढी एकादशीचा भक्तिमय सोहळा उत्साहात संपन्न.

🚀 "स्वप्नांना आकाशाची सीमा नसते" – प्रिन्स इंग्लिश स्कूलच्या पूजाने रचला इतिहास!

पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या हस्ते प्रिन्स इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थिनींचा परभणी जिल्हाधिकारी कार्यालयात सत्कार.