प्रिन्स इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांचे यश: फ्लोअर बॉल स्पर्धेत तीन रौप्य पदके!

राज्यस्तरीय फ्लोअर बॉल स्पर्धेत प्रिन्स इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांचे यश; तीन रौप्य पदके. सेलू, : जळगाव येथे १५ ते १७ ऑगस्ट २०२५ दरम्यान जळगाव जिल्हा फ्लोअर बॉल असोसिएशन आयोजित 11व्या राज्यस्तरीय फ्लोअर बॉल स्पर्धेत परभणी जिल्ह्याच्या संघाने १४ आणि १९ वर्षांखालील गटात एकूण तीन रौप्य पदके मिळवली. श्रीराम प्रतिष्ठान संचलित एल. के. आर. रोडगे प्रिन्स इंग्लिश स्कूल, सेलू येथील इयत्ता ९ वीच्या पाच विद्यार्थ्यांचा या यशस्वी संघात समावेश होता. त्यांनी आपल्या उत्कृष्ट कामगिरीने शाळेचे नाव उज्ज्वल केले. परभणी संघात वैभव उत्तम शेळके, प्रवीण कैलास बंदुके, एकलनाथ नरहरी माघाडे, वैभव संजय बोडके आणि निलेश अर्जुन बोडखे या प्रिन्स इंग्लिश स्कूलच्या इयत्ता ९ वीच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट प्रदर्शन केले. त्यांच्या सांघिक खेळामुळे परभणी संघाने रौप्य पदके मिळवली. या यशात शाळेचे क्रीडा शिक्षक कुणाल चव्हाण, सुरज शिंदे, प्रमोद गायकवाड आणि कपिल ठाकूर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. त्यांनी विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देऊन स्पर्धेसाठी तयार केले. या प्रशिक्षकांनी विद्यार्थ्यांमध्ये सांघिक भावना आणि ...