राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार 2025 साठी अर्ज प्रक्रिया सुरू!

🏆 राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार 2025 साठी अर्ज प्रक्रिया सुरू! भारत सरकारतर्फे दरवर्षी दिला जाणारा राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार (National Awards to Teachers - NAT) हा शिक्षकांच्या कार्याची दखल घेणारा आणि प्रेरणादायक सन्मान आहे. 2025 सालासाठी या पुरस्कारासाठी अर्ज प्रक्रिया २३ जून २०२५ पासून सुरू झाली असून १३ जुलै २०२५ पर्यंत खुली आहे. 🧑🏫 कोण अर्ज करू शकतात? राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारासाठी शासकीय, अनुदानित, स्थानिक स्वराज्य संस्था मान्यताप्राप्त तसेच खाजगी प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांतील शिक्षक पात्र आहेत. शिक्षकांनी विद्यार्थ्यांसाठी केलेले अभिनव उपक्रम, दर्जेदार अध्यापन, सामाजिक सहभाग, शैक्षणिक नेतृत्व या बाबींच्या आधारे या पुरस्कारासाठी निवड केली जाते. 🌐 अर्ज करण्याची लिंक: शिक्षकांनी खालील संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन अर्ज भरावेत: 👉 https://nationalawardstoteachers.education.gov.in 🗓️ अर्ज करण्याची कालमर्यादा: 📅 २३ जून २०२५ ते १३ जुलै २०२५ अर्ज भरण्यानंतर संबंधित कागदपत्रांसह एक फाईल आपल्या शाळा निरीक्षक/शिक्षणाधिकारी कार्यालयात सादर करणे आवश्यक आहे. 📌 ...