प्रिन्स इंग्लिश स्कूलची राष्ट्रीय स्तरावर निवड; रजनी दरशिंबेला ‘बेस्ट डिफेंडर’ पुरस्कार, परभणी संघ उपविजेता.
प्रिन्स इंग्लिश स्कूलची राष्ट्रीय स्तरावर निवड; रजनी दरशिंबेला ‘बेस्ट डिफेंडर’ पुरस्कार, परभणी संघ उपविजेता. दि. ३१ ऑगस्ट २०२५: श्रीराम प्रतिष्ठान संचलित एल. के. आर. रोडगे प्रिन्स इंग्लिश स्कूल, सेलू येथील विद्यार्थिनी रजनी दरशिंबे आणि परभणी जिल्ह्याच्या संघाने महाराष्ट्र राज्य ॲमेच्युर कबड्डी फाऊंडेशन, नाशिक जिल्हा ॲमेच्युर कबड्डी असोसिएशन आणि क्रीडा भारती, नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ३५व्या किशोर-किशोरी गट कबड्डी राज्य निवड चाचणी स्पर्धेत (The 35th Sub Junior State Selection Trial Tournament) घवघवीत यश मिळवले. दि. २९ ते ३१ ऑगस्ट २०२५ रोजी मीनाताई ठाकरे स्टेडियम, आर कॉम्प्लेक्स, बुद्ध विहार जवळ, कोणार्क नगर २, नाशिक येथे संपन्न झालेल्या या स्पर्धेत परभणी संघाने उपविजेता (द्वितीय क्रमांक) मिळवला आणि राष्ट्रीय स्पर्धेसाठी पात्रता प्राप्त केली. प्रिन्स इंग्लिश स्कूलच्या रजनी दरशिंबे हिने आपल्या उत्कृष्ट बचावात्मक खेळाने सर्वांचे लक्ष वेधले आणि ‘बेस्ट डिफेंडर ऑफ द टूर्नामेंट’ पुरस्कार पटकावला. तिच्या चपळाई आणि रणनीतीक खेळामुळे परभणी संघाला उपविजेतेप...